जेऊरला बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
वाल्हे, ता. १६ : जेऊर (ता. पुरंदर) येथे श्री बाळूमामा देवस्थान कार्यकारी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी (ता. १३) ते सोमवारी (ता. १६) चार दिवसीय संत सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
भंडारा उत्सवानिमित्त सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह, होमहवन, भजन, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून येथील बाळूमामा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या मंदिराच्या प्रांगणात हा उत्सव उत्साहात पार पडला. उत्सवानिमित्त दररोज सायंकाळी कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. शुक्रवारी (ता. १३) वैभव महाराज धुमाळ, शनिवारी (ता. १४) प्रिया महाराज तांबे, रविवारी (ता. १५) पुंडलिक महाराज रसाळ, तर सोमवारी (ता. १६) ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे कीर्तन झाले.
दररोज कीर्तनानंतर महाआरती घेऊन उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री बाळूमामा देवस्थान कार्यकारी मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
06714
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

