दौंडज येथील अनंत मठात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात
वाल्हे, ता. २० : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात दौंडज (ता. पुरंदर) येथील स्वामी समर्थ अनंत मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काकडा आरती, अभिषेक, दत्तयाग, प्रवचन, पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
प्रकटदिनानिमित्त मंदिरामध्ये पाना-फुलांची, पताकांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त सदगुरू अनंत पोतदार महाराजांच्या आशीर्वादाने दोन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज (ता. २०) पहाटे काकडा आरती, अभिषेक, स्वामीगायत्री यज्ञ झाला. यावेळी आळंदी येथील मंगेश महाराज कदम यांच्या हस्ते श्रींची पूजा झाली. त्यानंतर स्वामी समर्थांच्या जीवनकार्यावर व भक्ती महात्म्यावर प्रवचन झाले. दुपारी साडेबारा वाजता स्वामी प्रकट दिन सोहळा पार पडल्यानंतर भाविकांनी पुष्पवृष्टी केली. याप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसभर भजन, काकड आरती, दत्तयाग, महाप्रसादाचे तसेच श्रींची पालखी मिरवणुक, शेजारती आदी भरगच्च कार्यक्रमांसह श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन साजरा झाला. दुपारी मांडकी येथील भजनी मंडळाने तर सायंकाळी दौंडज येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. प्रकटदिनानिमित्त नरसिंग जगताप, राजेंद्र साळुंके, ज्ञानेश्वर साळुंके, विकास जगताप, वैभव कदम, तुषार कदम यांच्या वतीने दुपारी व सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तर रामदास कदम व राहुल पवार यांनी मंडप व आकर्षक विद्युत रोशणाईची व्यवस्था केली. यावेळी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भाविकांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन प्रियांक भुजबळ यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

