वाल्ह्यात पथनाट्यातून जलसंवर्धनाची जनजागृती म
वाल्हे, ता. २२ : वाल्हे (ता. पुरंदर) येथे रविवारी (ता. २२) जागतिक जलदिनानिमित्त ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात जल संवर्धन विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी पथनाट्यातून जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
युनायटेड वे मुंबईच्या ‘उन्नती’ प्रकल्पांतर्गत ठिबक सिंचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रकल्पांतर्गत कृषी व मृद-जल संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाअंतर्गत सुमारे १५ एकर क्षेत्रासाठी ठिबक सिंचन संच वितरण झाले असून पुढील टप्प्यात ७५ एकर क्षेत्रासाठी अधिक संचांचे वितरण करणार आहे. ललित कदम व कैलास ताकवले यांनी पाण्याचा कार्यक्षम वापर सिंचनाचे वेळापत्रक आणि पाणी व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. पथनाट्यातून देवानंद भालेराव, डॉ. पंकज बारबेले, ईश्वरी ढमढेरे, प्रतीक जगताप, पूजा चिव्हे आदींनी जलसंवर्धनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.
याप्रसंगी माजी सभापती गिरीश पवार, माजी सरपंच अमोल खवले, संभाजी पवार, माजी उपसरपंच शांताराम पवार, उपसरपंच सागर भुजबळ, नीलेश पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
११ शेतकऱ्यांना ८५ हजारांचा सिंचन संच प्रदान
युनायटेड वे मुंबईच्या माध्यमातून वाल्हे येथील ११ शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रत्येकी जवळपास ८५ हजार रुपयांचे पूर्ण ड्रीप सिंचन संच देखील प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढीस मोठा फायदा होईल, असा विश्वास माजी सरपंच अमोल खवले यांनी व्यक्त केला.
06776
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

