

वाल्हे, ता. २८ : नीरा-शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकीत बिलामुळे शुक्रवारी (ता. २७) खंडित झाला होता. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र, माजी उपसरपंच राजेश काकडे यांनी वाढदिवसाचा आनंद साजरा करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेत अवघ्या २४ तासांत पाणीपुरवठा पूर्ववत करून ग्रामस्थांना दिलासा दिला.
पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २८) सकाळीच काकडे गटविकास अधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांशी तातडीची चर्चा केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्वरित तोडगा काढत पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करून घेतला. या कामात माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांचीही मोलाची साथ लाभली. दोघांच्या समन्वयातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अल्पावधीतच वीजपुरवठा सुरळीत झाला.गावातील नळांना पुन्हा पाणी येऊ लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला
दरम्यान भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
नीरा ग्रामपंचायतीच्या वीजबिलाची थकबाकी झाल्यामुळे त्यांच्या पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन शुक्रवारी कट करण्यात आले होते. नव्याने नियुक्त ग्रामसेवकांकडे सहीसाठी तांत्रिक अडचण आहे. ग्रामपंचायतीने पैसे सोमवारी भरण्याचे ठरवले असल्यामुळे, तातडीने तुर्तास पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन पुन्हा सुरू केले असल्याचे नीरा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.