

वाल्हे, ता. ४ : पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांच्या चांदीच्या मूर्तीची गतवर्षी भरदिवसा चोरी झाल्याची घटना घडली होती. वर्ष उलटूनही या चोरीचा तपास लागला नसल्याने ग्रामस्थांनी एकमताने नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी पाषाणातून बनविलेल्या नव्या मूर्तीसाठी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. पानाफुलांनी आणि फुग्यांनी सजविलेल्या बैलगाडीत मूर्ती ठेवली होती. पारंपरिक ढोल-ताशे आणि लेझीमच्या गजरात गावातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक निघाली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषामुळे परिसर संपूर्ण उत्सवी रंगात न्हाल्यासारखा दिसत होता. या सोहळ्यात आबालवृद्धांसह तरुणांनी सहभाग घेतला. शनिवारी (ता. ४) सकाळी होम-हवनसह विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा करून ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांच्या नव्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, मुंबईच्या उपजिल्हाधिकारी गीतांजली शिर्के, सरपंच सुवर्णा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.