थेट बांधावर मदतीचा हात देण्याची ग्वाही

थेट बांधावर मदतीचा हात देण्याची ग्वाही
Published on

वाल्हे, ता. ५ : पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे नुकत्याच झालेल्या वादळीवारे व पावसामुळे केळी बागांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी
(ता. ५) महसूल अधिकाऱ्यांसह नवनिर्वाचीत सभापती अमित झेंडे यांनी थेट शेतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या व्यथा एकून घेत त्यांनी लवकरच मदतीचा हात देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, पावसाने येथील संतोष चोरगे यांचे ४० गुठ्यांची तोडणीला आलेल्या केळीच्या बागांचे ५ ते ६ लाख तर मनोहर धुमाळ यांच्या २० गुंठ्यांतील जवळपास ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे मंडल अधिकारी बापूसाहेब देवकर यांनी सांगितले.
दरम्यान, कृषी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com