

वाल्हे, ता. ४ : पिंगोरी (ता. पुरंदर) येथे रविवारी (ता. ३) रात्री लागलेल्या भीषण वणव्यामुळे शेकडो एकरांवरील वनसंपदा जळून खाक झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीने क्षणार्धात विक्राळ रूप धारण
करत शेकडो एकर परिसर व्यापला. यामुळे मोठे नुकसान झाले.
माजी सरपंच जीवन शिंदे यांनी सांगितले की, शिंदेनगर परिसरात रात्रीच्या सुमारास डोंगराकडून धुराचे लोट उठताना दिसले. त्यानंतर ग्रामस्थांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग वेगाने पसरली आणि संपूर्ण परिसर धुराने वेढला गेला. परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी तसेच शासकीय वनजमीन असून वनविभागाने येथे वनीकरणाची कामे केली आहेत. मात्र, वारंवार लागणाऱ्या आगीमुळे या जंगलाचे मोठे नुकसान होत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, वनसंवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असताना काही जणांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याचे दिसत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
07063
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.