चिंचवड विधानसभा मतदारसंघात ‘महिला राज’; भाजपचा बोलबाला
वाकड, ता. २३ : महापालिका निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या महिला उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. हा विजय केवळ आकड्यांचा खेळ न राहता, सत्तास्थापनेच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरत आहे. तब्बल १३ प्रभागांमध्ये भाजपच्या महिला उमेदवारांनी विजय मिळवत हजारो मतांची आघाडी घेतली आहे, यामुळे महापालिकेत आगामी काळात आता महत्त्वाच्या पदावर महिलांना संधी देत भाजप ‘महिला राज’ आणणार का? असा प्रश्न चर्चेत आहे.
प्रभागनिहाय कंसात मिळालेल्या मताधिक्यासह पाहता, प्रभाग २६ मध्ये स्नेहा कलाटे (१४,३४९), आरती चोंधे (५,८६०) यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. प्रभाग २५ मध्ये श्रुती वाकडकर (१०,८१४), रेश्मा भुजबळ (१४२५७), प्रभाग १८ मध्ये अपर्णा डोके (९५४३), मनिषा चिंचवडे (९८०२) यांनी दमदार कामगिरी केली. प्रभाग १७ मध्ये आशा सूर्यवंशी (४५२३), प्रभाग २२ मध्ये नीता पाडाळे (७,७३३), प्रभाग २८ मध्ये कुंदा भिसे (८१६२), प्रभाग २९ मध्ये रविना अंघोळकर (७६१४), प्रभाग २७ मध्ये सविता खुळे (२२५४), प्रभाग ३१ मध्ये पल्लवी जगताप (४,९६४) प्रभाग ३२ मध्ये तृप्ती कांबळे (४२९७) या भाजपच्या महिला उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
चिंचवड विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशामुळे पक्ष आगामी काळात महत्त्वाची पदे महिलांना देणार का? व भाजप ‘महिला राज’ची मुहूर्तमेढ रोवणार का? याकडे संपूर्ण पिंपरी चिंचवडचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पक्षाच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

