धुक्यामुळे पिकांना धोका आंबेगावाच्या पूर्व भागातील चित्र; ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुक्यामुळे पिकांना धोका 
आंबेगावाच्या पूर्व भागातील चित्र; ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त
धुक्यामुळे पिकांना धोका आंबेगावाच्या पूर्व भागातील चित्र; ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त

धुक्यामुळे पिकांना धोका आंबेगावाच्या पूर्व भागातील चित्र; ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त

sakal_logo
By

पारगाव, ता. ३ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात ढगाळ वातावरण तयार होत असून पहाटेच्या वेळी धुके पडत आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
मागील महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरू लागला होता. मागील आठवड्यापासून पडत असलेल्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले होते. गहू, हरबरा, कांदा आदी पिकांची वाढ जोमाने होऊ लागली होती. परंतु, गेल्या तीन चार दिवसांपासून परिसरात पहाटे धुके पडत असून दिवसभर ढगाळ वातावरण राहत आहे. यामुळे रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. तसेच करपा, आकडी रोग, मावा आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोकाही वाढला आहे.

कोथिंबीर पिकांवर करपा, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे फवारणी खर्चात वाढ होणार असून उत्पादनात घट होणार असल्याची माहिती वाळुंजनगर येथील कृषी पदवीधर जयेश वाळुंज यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top