राजेंद्र पवार यांना श्री मोरया पुरस्कार प्रदान
चिंचवड, ता. २७ : महासाधू श्री. मोरया गोसावी यांच्या ४६० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे सामाजिक योगदाना बद्दल बांधकाम व्यावसायिक राजेंद्र सोपान पवार, यांना यंदाच्या श्री मोरया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समाजाचे आपण देणं लागतो या उदात्त भावनेतून राजेंद्र पवार अनेक वर्षे समाजसेवेत आहेत. अनाथालय व वृद्धाश्रमांना ते नियमित अन्य-धान्य वाटप करतात. लॉकडाऊनमध्ये गरजू नागरिक, वीटभट्टी व लेबरकॅम्प मधील हजारो बांधकाम कामगारांच्या पोटाचा प्रश्न त्यांनी सोडविला. जनावरे, पशू-पक्षांच्या चारा-पाण्याची सोय केली. भिक्षेकऱ्यांसाठी काम करणाऱ्या बेगर्स डॉक्टर्स या संस्थेला देणगी दिली. त्यांना कोरोना योद्धा या किताबाबरोबर बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार गृह प्रकल्प उभारल्याची दखल घेत विविध संस्थांनी गौरविले आहे.
खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, डॉ. एकनाथ खेडेकर नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी पोलिस उपायुक्त शहाजी उमाप, आनंद तांबे, अपर्णा डोके, ॲड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, ऑस्टिन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राजू भिसे, गजानन चिंचवडे, विजय पवार, अमोल राऊत, ज्ञानेश्वर पारखे, पांडुरंग नवले, सुनील जोशी, दीपक नवले, संतोष साठे, उत्तमराव बोडके, ओमकार पवार, संदीप दळवी, नीलेश दळवी, गजानन वाल्हेकर, योगेश वाल्हेकर, राहुल भेगडे, महावीर गांधी, संजय पवार, राम सुकरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.