
शिका आवश्यक सॉफ्ट स्किल्स
पुणे, ता. १५ : पर्सनल व प्रोफेशनल आयुष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व अधिक असणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (ता. २०) सॉफ्ट स्किल्सविषयी १५ दिवसांची कार्यशाळा सुरु होत आहे. सॉफ्ट स्किल्समध्ये अधिक चांगले जीवन जगण्यासाठीच्या अनेक कौशल्यांचा समावेश होतो. या कार्यशाळांमध्ये सेल्फ मोटिव्हेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट, अडॉप्टीबिलीटी, कन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, पर्सनल स्किल्स फॉर माईंड, ट्रांसफरेबल स्किल्स आणि त्यांचे महत्त्व, काळजी वा चिंतेला सामोरे जाण्याचे मार्ग, सहानुभूती, लक्ष्य साध्य करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, अपयशाला सामोरे कसे जावे, सेल्फ अवेअरनेस, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आदींबाबत या विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क ३५४० रुपये.
संपर्क : ७३५०००१६०२
संकेतस्थळ : https://bit.ly/apgsoftskill
एसआयआयएलसी
स्पेशल चाट पदार्थांविषयी कार्यशाळा
पुणे, ता. १५ : ओली व सुकी भेळ, आलू चाट, पाणीपुरी इत्यादी आवडीचे व चटकदार चाट पदार्थ घरच्याघरी बनवण्याविषयी ऑनलाइन कार्यशाळा २२ डिसेंबरला आयोजिली आहे. यात ओली भेळ, सुकी भेळ, आलू चाट, शेवपुरी, दही शेवपुरी, भेळपुरी, रगडा पॅटिस, पाणीपुरीचे तिखट व गोड पाणी, लाल तिखट चटणी, हिरवी चटणी, खजूर चटणी तसेच पापडी चाट इ.पदार्थ बनविण्याविषयी मार्गदर्शन होईल. प्रतिव्यक्ती शुल्क ५०० रुपये.
संपर्क : ८६६९६८९०१५, ९१४६०३८०३१
संकेतस्थळ : https://bit.ly/३DQc३HR
लज्जतदार टिक्का व कबाब
घरच्याघरी विविध प्रकारचे चिकन स्टार्टर्स बनवायला शिकून मित्र व नातेवाइकांना रुचकर ट्रीट देण्याची संधी आहे. विविध प्रकारचे चिकन स्टार्टर्स बनवण्यास शिकवणारी ऑनलाइन कार्यशाळा २९ डिसेंबर रोजी आयोजिली आहे. यामध्ये चिकन तंदुरी, चिकन टिक्का, मलाई टिक्का, हरियाली टिक्का, चिकन क्रिस्पी, हंगामा कबाब, चिकन स्टिक्स, चिकन शमी कबाब या स्टार्टर्सचा समावेश असेल. यादरम्यान विविध ट्रिक्स व सिक्रेट टिप्स सांगितल्या जातील. प्रतिव्यक्ती शुल्क ५०० रुपये.
संपर्क : ८६६९६८९०१५, ९१४६०३८०३१
संकेतस्थळ : https://bit.ly/३DQc३HR
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..