भव्य शोभा यात्रेने हिंदू नववर्षाचे स्वागत वाकड परिसर झाला भगवामय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भव्य शोभा यात्रेने 
हिंदू नववर्षाचे स्वागत

वाकड परिसर झाला भगवामय
पुण्यात धावली पहिली स्वदेशी हायड्रोजन बस

भव्य शोभा यात्रेने हिंदू नववर्षाचे स्वागत वाकड परिसर झाला भगवामय

sakal_logo
By

वाकड, ता. ३ : भारतीय हिंदू संस्कृतीप्रमाणे हिंदू नव वर्षाचे भव्य शोभा यात्रेने स्वागत करण्यात आले. प्रभू श्री रामचंद्र की जय, शिवाजी महाराज की जय असा जय घोष करत तसेच पारंपरिक वाद्यांचा निनाद, फटाक्यांची आतिषबाजी, जागोजागी पुष्पवृष्टीने स्वागत अन भगवे झेंडे, भगवे फेटेधारी नागरिकांच्या गर्दीने वाकड परिसरातील वातावरण प्रसन्न आणि भगवेमय झाले होते.
पाडव्याची शनिवारी सुट्टी सायंकाळची रम्य वेळ अन दुसऱ्या दिवशी पुन्हा रविवार त्यामुळे वाकड परिसरातील आयटी अभियंत्यांनी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत या शोभा यात्रेत सहकुटुंब सहभागी झाले होते. या यात्रेत लहान मुले व महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती. चौका चौकात महिलांनी धरलेला फुगड्यांचा फेर टिपण्यासाठी अनेकांनी मोबाईल काढले. तर काहीजण हा क्षण आपल्या कुटुंबासह टिपण्यासाठी सेल्फी काढण्यातही व्यस्त दिसले. आकर्षक सजावट केलेल्या भव्य रथात प्रभू श्री राम चंद्राची भव्य मूर्ती अन त्यामागे बैलगाडी, प्रभू रामचंद लक्ष्मण व सीता माई यांच्या वेशभूषेतील चिमुकले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी स्वयंसेवक तैनात होते. प्रथम सोसायटी पोलिस लाईन, येथून प्रारंभ झालेली शोभा यात्रा युरो स्कूल, पालाश सोसायटी, जानोबा चौक, दत्त मंदिर रोड, उत्कर्ष चौक, म्हातोबा चौक, छत्रपती चौक या मार्गाने अखेर कस्पटे वस्ती येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सांगता करण्यात आली. हिंदू नव वर्ष स्वागत समिती वाकड यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..