Ajit Pawar
Ajit PawarSakal media

पुण्यातील शाळा आठवडाभर बंदच

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व शाळा किमान आणखी एक आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहेत.
Summary

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व शाळा किमान आणखी एक आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहेत.

पुणे - पुणे शहर, (Pune City) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व शाळा (School) किमान आणखी एक आठवडाभर बंद (Close) ठेवण्यात येणार आहेत. शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) वाढत असल्याने सध्या शाळा सुरू करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय पुढील आठवड्याच्या कोरोना आढावा बैठकीनंतर घेण्यात येईल, अशी घोषणा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

पालकमंत्री पवार यांनी शनिवारी आयोजित केलेल्या बैठकीत शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील स्थानिक पातळीवरील कोरोना परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असे सांगितले आहे. पुणे शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. या परिस्थितीत शाळा सुरू करणे योग्य नसल्याने आणखी आठवडाभर शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

Ajit Pawar
रविवारीही मिळणार आता पुणे शहरातील ज्‍येष्ठांना लस

राज्यात सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. ही लाट सुरू होण्यापूर्वी राज्यातील सर्व शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण तिसरी लाट सुरू झाल्यानंतर येत्या ३१ जानेवारीपर्यंत पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, मात्र तिसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांना पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या तुलनेत कमी त्रास होत आहे. लक्षणे सौम्य दिसत आहेत. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावयाची गरज भासत नाही. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर येत्या २४ जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. परंतु यासाठी स्थानिक पातळीवरील कोरोना परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात यावा, असे गायकवाड यांनी जाहीर केले होते. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील शाळा सुरू होणार की नाही, याबाबत शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तो संभ्रम पवार यांच्या शनिवारच्या घोषणेमुळे दूर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com