
जिल्ह्यात दिवसभरामध्ये ७८२ नवे कोरोना रुग्ण
पुणे, ता. १३ : पुणे जिल्ह्यात रविवारी (ता.१३) दिवसभरात ७८२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. याउलट दिवसात २ हजार ९९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा एक अंकी झाला आहे. आठवडाभरानंतर शनिवारी (ता.१२) पहिल्यांदा दिवसातील मृत्यूची संख्या एक अंकी झाली होती.
जिल्ह्यातील दिवसातील दोन्ही मृत्यू हे फक्त पुणे शहरातील आहेत. रविवारी दिवसभरात पिंपरी चिंचवड, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज कोरोना आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो.
जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४२४ रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये १८५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ११९, नगरपालिका हद्दीत ३६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ३७७ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ७१८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७५६, नगरपालिका हद्दीतील ८० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..