सुप्यात एटीएमजवळ पोलिसांची गस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुप्यात एटीएमजवळ पोलिसांची गस्त
ठार

सुप्यात एटीएमजवळ पोलिसांची गस्त

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १८ ः एटीएम केंद्राजवळ कुणी घुटमळत असेल, तर त्यांच्यावर आता पोलिसांनी वॉच ठेवायला सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास सुपे (ता. बारामती) येथील एटीएमजवळ मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस गस्त घालत असताना सभेस केशव भोसले (रा. कोळोली, ता. बारामती पोलिसांना संशयितरीत्या आढळून आला. एसटी स्टॅन्ड परिसरातील एटीएमच्या पाठीमागे अंधारात भोसले लहानमोठ्या चोऱ्या करण्याच्या उद्देशाने लपून बसल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुर्टी येथे नुकताच एक एटीएम मशिन चोरीचा प्रकार घडला. यामध्ये २ लाख ८६ हजार ५०० रुपये चोरीला गेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एटीएम सेंटरजवळ गस्त वाढवली आहे. परिसरातील दुकानदारांनी आपापले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याची खात्री करावी, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..