पान ३ मेन

पान ३ मेन

मोठा फोटो- 13963
--
01826
जोतिबा डोंगर : जोतिबा देवाची राम रुपातील बांधलेली महापूजा.

बेळगावकरांच्या बैलगाड्या डोंगराकडे
----
जोतिबा चैत्र यात्रेची लगबग; दर्शन रांगेची प्रशासनाकडून चाचणी
निवास मोटे ः सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. १० ः राम-लक्ष्मण, सर्जा राजा, शाम-सुंदर, या बैलजोड्या, त्यांच्या अंगावर रंगीत झुल, गळ्यात घुंगराचा आवाज, आणि भाविकांच्या खांद्यावर सासनकाठी,‘जोतिबाच्या नावानं चांगभलं''चा जयघोष करीत जोतिबा चैत्र यात्रेसाठी बेळगाव (कर्नाटक) येथील बैलगाड्या सासनकाठ्या घेऊन आज कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या. सोमवार (ता. ११) निगवे दुमाला (ता. करवीर) येथे यांचा मुक्काम असेल. मंगळवारी या बैलगाड्या डोंगरावर दाखल होतील.
१२८ किलोमीटरचा त्यांचा हा पायी प्रवास पूर्ण होणार असून १७ एप्रिलपर्यंत त्यांचा मुक्काम डोंगरावर असेल. दोन वर्ष झाले कोरोनामुळे थांबलेली ही परंपरा यंदा कायम राहिली.
मुले-मुली वयोवृद्ध महिला पुरुषांचाही सहभाग आहे, सुमारे ८० भाविक ३० बैलगाड्यातून डोंगरच्या दिशेने येत आहेत. आज रामनवमीनिमित्त जोतिबाची श्रीराम रूपातील महापूजा बांधली. रविवार असल्यामुळे डोंगरावर गर्दी होती. डोंगरावर आज उस्मानाबाद, लातूर, बीड भागातील भाविक मोठ्या प्रमाणात आले.
आज नव्याने बांधलेल्या दर्शन मंडपात भाविकांच्या रांगेची चाचणी घेतली.


स्वच्छता मोहीम
चैत्र यात्रेनिमित्त पन्हाळा तहसील विभाग, प्रांताधिकारी, ग्रामपंचायत व देवस्थान समितीने स्वच्छता मोहीम राबवली. भाविक सेवाभावी संस्था यांनीही हातभार लावला. सेंटर प्लाझा येथे सुमारे १० ट्रॉली कचरा आजच्या स्वच्छता मोहिमेत काढला. यात्रा झाल्यानंतर पुन्हा ही मोहीम घेण्यात येणार आहे. प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे देवस्थानचे सचिव शिवराज नायकवाडे, दीपक म्हेतर, सरपंच राधा बुणे, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड उपस्थित होते.
......
स्पीकर बंद
जोतिबा चैत्र यात्रेदिवशी डोंगरावर दुग्ध व्यवसायाची जाहिरात करणारे स्पीकर दुकानात लावले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. यावर यंदा प्रशासनाने बंदी आणली आहे. कोणी लावताना सापडल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज दर्शनासाठी
महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी आज दुपारी जोतिबा देवाचे दर्शन घेतले. या वेळी ग्रामस्थ, पुजारी यांनी त्याचा सत्कार केला. मंदिरात तर भाविकांनी त्यांना पाहाण्यासाठी गर्दी केली.

सासनकाठी, मानपान
ऑनलाईन नोंदणीचे उद्घाटन
जोतिबा डोंगर जोतिबा देवाच्या संबंधित सर्व सासनकाठी तसेच इतर सर्व परंपरागत मानपान व देवस्थाने यांचे आॕनलाईन नोंदणी प्रक्रियेचा उद्घाटन सोहळा श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाला. हा कार्यक्रम श्री नाथ केदार सेवा मंडळाचे माध्यमातून झाला.यावेळी हिम्मतबहाद्दर चव्हाण , भीमबहाद्दर माने, श्री नावजीनाथ देवस्थान ट्रस्ट , रेठरे बुद्रूक साळुंखे आदी श्री जोतिबा मानकरी मंडळी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com