
सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटीलांचा सन्मान
खळद, ता. २५ : एखतपूर मुंजवडी (ता.पुरंदर) येथे पंचायतराज दिनाचे औचित्य साधून लोकशाहीतील महत्वाचे घटक असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील युवक सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांचा राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला.
लोकशाहीचा सर्वात मूलभूत आणि महत्वाचा घटक म्हणजे पंचायती, पंचायती सुदृढ करणे हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे आणि त्या सुदृढ करायच्या असतील तर मतदारांनी लोकप्रतिनिधींना वेळोवेळी प्रश्न विचारणे, त्यांचा कार्य अहवाल मागणे आणि पंचायतीच्या हितासाठी काम करवून घेणे महत्वाचे आहे. याला बळकटी मिळण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांचे सूचनेनुसार तसेच पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण दगडे यांचे मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बंडू धिवार, साईनाथ झुरंगे, संपत झुरंगे, काळूराम झुरंगे, उत्तम टिळेकर, विठल गद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
01468
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..