पुणे- दानापूर एक्सप्रेस एलएचबी कोचसह धावणार

पुणे- दानापूर एक्सप्रेस एलएचबी कोचसह धावणार

पुणे, ता. ४ ः पुणे-दानापूर-पुणे एक्स्प्रेस या रेल्वे गाडीला लिंक हॉफमेन बुश (एलएचबी) कोच बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कोचसह पुण्यातून २५ मार्च तर दानापूर येथून २७ मार्च पासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.
एलएचबी कोच हे सामान्य कोच पेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जरी गाडीला अपघात झाला तरी या कोचची एकमेकांशी टक्कर होत नाही. तसेच ते उलटण्याचीही शक्यता कमी असते. जुन्या पारंपरिक कोचच्या तुलनेत या कोचेसचा आवाज कमी असतो. या कोचेसना पॉवर ब्रेक आल्याने गाडीचे ब्रेक लावताना बसणारा झटका या कोचला बसत नाही. जुन्या कोच पेक्षा यामध्ये आसन क्षमता अधिक असून आरामदायक आहे. तसेच दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, सहा शयनयान, चार द्वितीय आसन श्रेणी (जनरल), एक पँट्री कार आणि एक जनरेटर व्हॅन असे एलएचबीचे स्वरूप असणार आहे, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com