टोमॅटो, वांगी, कोबी स्वस्त मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोमॅटो, वांगी, कोबी स्वस्त

मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढ
टोमॅटो, वांगी, कोबी स्वस्त मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढ

टोमॅटो, वांगी, कोबी स्वस्त मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढ

sakal_logo
By

मंडई

मार्केट यार्ड, ता. १३ : बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढली. आवक वाढल्याने टोमॅटो, वांगी, कोबीच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली, तर उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

बाजारात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. परराज्यांतून प्रामुख्याने कर्नाटक आणि गुजरातहून आठ ते दहा टेम्पो हिरवी मिरची, बंगळूरहून दोन टेम्पो आले, गुजरात येथून चार टेम्पो गाजर, राजस्थान येथून गाजर १३ ते १४ ट्रक, राजस्थान, मध्यप्रदेश येथून आठ ते दहा ट्रक मटार, कर्नाटक येथून १०० गोणी तोतापुरी कैरी, कर्नाटक येथून चार ते पाच टेम्पो टोमॅटो, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून १० ते १२ ट्रक लसूण इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आल्याची ८०० ते १००० पोती, भेंडी चार ते पाच टेम्पो, गवार दोन ते तीन टेम्पो, टॉमेटोची आठ ते दहा हजार क्रेट्स, फ्लॅावर १० ते १२ टेम्पो, कोबी ४ ते ५  टेम्पो, सिमला मिरची ८ ते१० टेम्पो, शेवगा १५० ते १७५ गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा १२५ ट्रक, आग्रा, इंदौर आणि स्थानिक भागातून बटाट्याची ४५ ते ५० ट्रक आवक झाली, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : २००-२८०, बटाटा : ११०-१४०, लसूण : १५०-५००, आले सातारी : १५०-२००, भेंडी : ४००-५००, गवार : गावरान व सुरती ८००-९००, टोमॅटो : ७०-१३०, दोडका : ४५०-५००, हिरवी मिरची : ६००-७००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : ३००-४००, काकडी : १००-२००, कारली : हिरवी ४५०-५००, पांढरी : २५०-३००, पापडी : २००-२५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १००-१५०, कोबी : १००-१८०, वांगी : १००-२००, डिंगरी : ३००-३५०, नवलकोल : १००-१५०, ढोबळी मिरची : ५००-६००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : ८००-१०००, गाजर : १२०-१५०, वालवर : १५०-२००, बीट : १५०-२००, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, मटार : परराज्य : २८०-३२०, पावटा : २००-२५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या स्वस्त

मार्केट यार्डात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक दीड लाख जुडी, मेथीची एक लाख जुडीची तर हरभरा गड्डी सुमारे १५ ते २० हजार जुडी इतकी आवक झाली. आवक वाढल्याने सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
: कोथिंबीर : २००-५००, मेथी : २००-४००, शेपू : ४००-५००, कांदापात : ४००-६००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ५००-७००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : ५००-६००, हरभरा गड्डी : ३००-६००.

‘व्हेलेंटाईन डे’ असूनही
गुलाबाला मागणी घटली

सोमवारी (ता. १४) ‘व्हेलेंटाईन डे’ असूनही यंदा गुलाबाला मागणी घटल्याचे दिसून आले. सोशल मिडीयावर ‘व्हेलेंटाईन डे’ दिवशी शुभेच्छा दिल्या जात असल्यामुळेच गुलाबाच्या मागणीत लक्षणीय घट झाल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.
मार्केटयार्डातील घाऊक फूलबाजारात सुट्या फुलांच्या भावात घट झाली आहे. मात्र, लग्नसराई सुरू असल्यामुळे शोभीवंत फुलांना मागणी वाढल्यामुळे त्यांचे दर तेजीतच आहे. दरम्यान, गेल्या
आठवड्याच्या तुलनेत व्हेलेंटाईन डे मुळे डच गुलाबांना अधिक मागणी वाढली आहे़. मात्र, ती दरवर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे फूल बाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे
: झेंडू : २०-४०, गुलछडी : ४०-८०, अष्टर : जुडी १०-१६, सुट्टा ६०-१००, कापरी : २०-५०, शेवंती : ५०-१००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ३०-४०, गुलछडी काडी : ६०-१५०, डच गुलाब (२० नग) : १२०-४००, जर्बेरा : ५०-७०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी १५०-३३०, लिलियम (१० काड्या) ९००-१२००, आॅर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१५०.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top