स्केचिंग, ऑईल पेंटिंगचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्केचिंग, ऑईल पेंटिंगचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
स्केचिंग, ऑईल पेंटिंगचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

स्केचिंग, ऑईल पेंटिंगचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : चित्रकलेत प्रोफेशनल करिअर बनवण्यासाठी मदत करणारा ‘बिकम अ प्रोफेशनल आर्टिस्ट’ हा दोन महिन्यांचा अभ्यासक्रम ३ जानेवारीपासून सुरु होत आहे. यामध्ये अनेक बारकाव्यांसह बेसिक पेंटिंग, फिगर स्टडी, स्टील लाईफ, पोर्ट्रेट्स आदींविषयी मार्गदर्शन केले जाईल. थिअरीसह तांत्रिक तपशीलावर भर दिला जाईल. ब्रशेसचे प्रकार, स्पॅटुला व रोलर्सचा वापर, पेंटिंग जतन करण्याच्या पद्धती, वास्तववादी आकृती, काल्पनिक रचना आदींचा सराव करून घेणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क २३,६०० रुपये.
संपर्क : ७३५०००१६०२
संकेतस्थळ : https://bit.ly/apg_sketching

एसआयआयएलसी
नॉनव्हेज स्टार्टर्सविषयी टिप्स
पुणे, ता. २२ : मुख्य आहार सुरु करण्यापूर्वी हॉटेल्समध्ये लज्जतदार व क्रिस्पी स्टार्टर्स ऑर्डर केले जातात. हेच स्टार्टर्स बनवायला शिकून मित्र व नातेवाईकांना रुचकर ट्रीट देण्याची संधी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाईन कार्यशाळा २९ डिसेंबर रोजी आयोजिली आहे. यामध्ये चिकन तंदुरी, चिकन टिक्का, मलाई टिक्का, हरियाली टिक्का, चिकन क्रिस्पी, हंगामा कबाब, चिकन स्टिक्स, चिकन शमी कबाब या स्टार्टर्सचा समावेश असेल. प्रतिव्यक्ती शुल्क ५०० रुपये.
संपर्क : ९८८१०९९७५७, ८६६९६८९०१५
संकेतस्थळ : https://bit.ly/३DQc३HR

पॅकेजिंग मटेरिअल बनविणारा उद्योग
फळे, फुले, भाजीपाला, धान्ये आदींचे व्यवस्थित पॅकेजिंग केल्याने त्याचा टिकाऊपणा वाढून हा माल दूरच्या बाजारपेठेत पाठविता येऊ शकतो, त्यास अधिक दर मिळून वाहतुकीत होणारे नुकसान कमी करता येते. व्यवस्थित पॅकेजिंग केलेल्या शेतमालाला ग्राहकाकांकडूनही मागणी आहे. पॅकेजिंग उद्योगाचे महत्व, गरज, संधी व आव्हाने, पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे मटेरियल, पॅकेजिंग कशा प्रकारचे असावे, पॅकेजिंगचे अद्ययावत प्रकार, पॅकेजिंगमुळे होणारे फायदे, भाज्या व फळांसाठी प्लास्टिक क्रेट पॅकेजिंग आदी विषयांची माहिती करून देणारी चार दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा रविवारी (ता.२६) सुरु होत आहे. प्रतिव्यक्ती शुल्क दहा हजार रुपये.
संपर्क : ९८८१०९९४२६
संकेतस्थळ : https://bit.ly/३DQc३HR

ऑटोमेशनद्वारे करा उत्कृष्ट गूळ निर्मिती
रसायनविरहीत (रेसिड्यु फ्री) गूळाला अधिक दर मिळतो. अशा दर्जेदार गूळाची निर्मिती ऑटोमेशन पद्धतीने कशी करावी याबाबत दोन दिवसांची ऑफलाईन कार्यशाळा शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) आयोजिली आहे. यात गुळापासून बनविता येणारे विविध प्रकार, गुळाचे चॉकलेट आकाराचे क्युबस, ऑटोमेशन प्रक्रिया, मशीनरी, अंदाजे गुंतवणूक, गूळाचे मार्केटींग इ.विषयी गूळ निर्मिती व ऑटोमेशनचा १० वर्षांचा अनुभव असलेले तज्ज्ञ संजीव कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क ३५०० रूपये. यात चहा, नाश्ता, जेवण व प्रशिक्षण सामग्री यांचा समावेश आहे.
संपर्क : ७४४७४४३१९८
संकेतस्थळ : https://bit.ly/३DQc३HR
(ठिकाण ः सकाळ मिडिया सेंटर, सकाळनगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे)