मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ३६ अधिकाऱ्यांविरोधात दोषारोपपत्र

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी जाहीर केल्यावर सुमारे ४० लाखांच्या नोटा बदलून देत बँकेच्या शाखांमधील कॅश बुकमध्ये खोट्या नोंदी केल्या
Muslim Co-operative Bank ltd
Muslim Co-operative Bank ltdsakal
Published on

पुणे : केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी जाहीर केल्यावर सुमारे ४० लाखांच्या नोटा बदलून देत बँकेच्या शाखांमधील कॅश बुकमध्ये खोट्या नोंदी केल्या. याप्रकरणी मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ३६ अधिकाऱ्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. विशेष न्यायाधीश गिरीश जी. भालचंद्र यांच्या न्यायालयात सीबीआयने हे दोषारोपपत्र दाखल केले.(Chargesheet against 36 officers of Muslim Co-operative Bank ltd.)

Muslim Co-operative Bank ltd
पुणे : नगर रोडवर भीषण अपघात; वाळुचा डंपर कारवर झाला पलटी

त्यामध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्यासह बँकेच्या प्रशासकीय कार्यालयातील पाच अधिकारी व सोळा शाखांचे व्यवस्थापक व रोखपाल, अशा एकूण ३६ जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२० बी, ४२०, ४७७-ए, २०१ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (२) आणि १३ (१) (डी) प्रमाणे फसवणूक करणे, पुरावा नष्ट करणे, कट रचणे असे आरोप ठेवले आहेत. याप्रकरणी सीबीआयने २९ डिसेंबर २०१७ रोजी खटला दाखल केला आहे. त्यामध्ये दोषारोपपत्र दाखल झाल्याने खटल्याच्या सुनावणीला गती मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com