नवाब मलिक यांच्याविरोधातील याचिकेवरील सुनावणी तहकूब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवाब मलिक यांच्याविरोधातील याचिकेवरील सुनावणी तहकूब
‘विधी’च्या अर्जातील सुधारणेसाठी आजपर्यंत मुदतवाढ

नवाब मलिक यांच्याविरोधातील याचिकेवरील सुनावणी तहकूब

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी केलेल्या मानहानीच्या याचिकेवरील सुनावणी एक आठवडा मुंबई उच्च न्यायालयाने तहकूब केली आहे.
मनी लाँडरिंग प्रकरणात मलिक सध्या कारागृहात आहेत. ते ३ मार्चपर्यंत कोठडीत आहेत. त्यामुळे ही सुनावणी तहकूब करण्यात आली. दरम्यान, वानखेडे यांनी सोमवारी एका प्रतिज्ञापत्रात न्यायालयाची माफी मागितली. मलिक यांनी न केलेल्या विधानाचा उल्लेख याचिकेत आल्याने ही दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात खटला पूर्ण होईपर्यंत विधान करणार नाही, अशी हमी दिली आहे. मात्र तरीही ते मानहानी करणारी विधाने करतात, असा आरोप ज्ञानदेव वानखेडे यांनी याचिकेत केला आहे.
...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..