
कळंबमधील प्रदर्शनात ११० जणांचा सहभाग
वालचंदनगर, ता.१ : कळंब (ता.इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीमधील व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेतील ११० विद्यार्थ्यांनी ४३ प्रकल्प सादर केले.
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. पहिली ते नववीपर्यंत ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये भूगर्भातील हालचाल ओळखण्यासाठी अर्थप्लेट अलाराम प्रकल्प, सॅनिटायझर मशिन प्रकल्प, वेल्डिंग मशिन प्रकल्प, शेतकऱ्यांना उपयुक्त असणारे ग्रास कटर, किडनीचे कार्य सांगणारा प्रकल्प, टाकावू वस्तूंपासून टिकावू वस्तु प्रकल्पासह ४३ नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्यात आले.
यावेळी फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी सांगितले की, लहान मुले अतिशय संवेदनशिल असतात. त्यांच्या डोक्यामध्ये नावीन्यपूर्ण कल्पना येतात. पालक व शिक्षकांनी त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यावा. आजची मुले उद्याची भवितव्य असून, देशाची भावी वैज्ञानिक असल्याने त्यांच्या कल्पनाशक्ती, विचारशक्तीकडे दुर्लक्ष करू नये, असे सांगितले. विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्राचार्य विजय रॉर्बट, घनश्री गायकवाड, अनिता साबळे, रेणुका गायकवाड, मनीषा लवटे, जयश्री जाधव यांनी प्रयत्न केले.
---
01920