राज्यात उष्माघाताचे १२१ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात उष्माघाताचे १२१ रुग्ण
ओमिक्रॉनला घाबरू नका, मात्र खबरदारी घ्या

राज्यात उष्माघाताचे १२१ रुग्ण

sakal_logo
By

पुणे - ‘ओमिक्रॉनला (Omicron) घाबरू (Afraid) नका. याचा अर्थ त्याच्याकडे दुर्लक्ष करा असा नाही, तर त्याचा संसर्ग (Infection) होणार नाही याची कसोशीने खबरदारी (Care) घ्या,’’ असा सल्ला भारतीय वंशाचे अमेरिकेतील डॉ. रवी गोडसे (Dr Ravi Godse) यांनी दिला. डॉ. गोडसे भारत दौऱ्यावर आले आहेत. त्या वेळी त्यांनी ‘सकाळ’च्या पुणे कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी हा सल्ला दिला.

डॉ. गोडसे म्हणाले, ‘देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा उद्रेक झाला. त्यानंतर डेल्टा प्लसने देशभर थैमान घातले. आता नव्याने ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळत आहेत. पण, त्यामुळे घाबरून जाऊ नका. आपण घाबरलो, तर आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. त्यातून संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ओमिक्रॉनचा बाऊ करू नका. त्याची खबरदारी घ्या.’ केंद्र सरकारचा ‘बूस्टर डोस’ देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढली पाहिजे. लसीकरण पूर्ण झाले पाहिजे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटाझरचा वापर करा, यातून कोरोनावर नियंत्रण होईल, असा विश्‍वास डॉ. गोडसे यांनी व्यक्त केला. सध्या भारतात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या खूप वेगाने वाढत नाही. आपल्या देशात यापूर्वी डेल्टा प्लस बहुतांश जणांना होऊन गेला आहे. त्यामुळे ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग तुलनेने कमी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: पुणे : अपंगांना कर सलवत देण्यासाठी पाठपुरावा

आपण आता सामूहिक प्रतिकार शक्तीच्या (हर्ड इम्युनिटी) उंबरठ्यावर पोचलो आहोत. ओमिक्रॉन भयंकर असता, तर तो बेसुमार वेगाने पसरला असता. पण, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या तीन शक्यता दिसतात. पहिली म्हणजे भारतात ओमिक्रॉन येऊन गेला असेल. देशातील बहुतांश नागरिकांना डेल्टा प्लसचा संसर्ग झालेला आहे. दुसरी म्हणजे, डेल्टाच आपल्याला ओमिक्रॉनपासून वाचवेल. आणि तिसरी शक्यता अशी की, ओमिक्रॉन अजून देशात मोठ्या प्रमाणात आलेला नाही.

ओमिक्रॉन नियंत्रणाची पंचसूत्री

  • लक्षण असतील त्यांचं टेस्टिंग करा

  • पॉझिटिव्ह आणि जोखमीच्या रुग्णांवर तातडीने उपचार करा

  • प्रतिकारशक्ती कमी होणारी औषधे घेणाऱ्यांना प्रतिबंधक औषधे द्या

  • बूस्टर डोस सगळ्यांना द्या सर्व लहान मुलांचे लसीकरण करा

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :corona infectionomicron
go to top