अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

संविधान शाहिरी जलसा
पुणे ः शाहीर संभाजी भगत यांचा संविधान शाहिरी जलसा आणि कोरोना योद्धांचा सन्मान सोहळा नुकताच ताडीवाला रस्ता येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष मयूर गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, नगरसेवक प्रदीप गायकवाड, आनंद सवाणे आदी उपस्थित होते.

कोरेगाव भीमा २०४ वा शौर्यदिन उत्साहात
पुणे ः कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयी स्तंभास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यप्रमुख ॲड. जयदेव गायकवाड यांनी अभिवादन केले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे, डॉ. दत्ता गायकवाड, प्रा. मयूर गायकवाड, लक्ष्मण सुरनर, सनी चव्हाण, संतोष बनसोडे आदी उपस्थित होते.

नव्या वर्षानिमित्त ‘दूध प्या’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे ः आम आदमी पक्ष पुणे शहर यांच्या वतीने नव्या वर्षानिमित्त ‘दारू नको दूध प्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णा गायकवाड यांच्या संकल्पनेतून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धनकवडी येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई, पक्षाचे प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे, घनश्‍याम मारणे, विनोद जवळकर, दीपक पाटोळे आदी उपस्थित होते.

सुरेखा मेंढे यांची उपाध्यक्षपदी निवड
पुणे ः भारतीय जनता पक्षाच्या हडपसर विधानसभा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी सुरेखा मेंढे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्याकडून मेंढे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी संदीप बेलदरे, अमर चिंधे, वैजनाथ बिराजदार, मनीषा सोनावणे, अशोक इंगळे, संतोष काळे, अमृत नानजकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top