शस्त्राचा धाक दाखवून भाजी विक्रेत्याला लुटले

शस्त्राचा धाक दाखवून भाजी विक्रेत्याला लुटले

Published on

पुणे, ता. १ ः सकाळी भाजी विक्री करण्यासाठी बसलेल्या भाजी विक्रेत्याला महिलेसह तिघांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता खडकी येथील राजीव गांधी चौपाटी परिसरात घडली. याप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी भाजी विक्रेता तौसिफ शेख (वय २३, रा. खडकी बाजार) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील राजीव गांधी चौपाटीच्या परीसरातील मंडईत तो भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शेख त्याच्या भाजी विक्रीच्या गाळ्यावर आला होता. त्यावेळी महिलेसह तिघेजण तेथे आले. त्यांनी धारदार हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या गल्ल्यातील रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर त्यांनी तेथील अन्य भाजी विक्रेत्यांनाही शस्त्राचा दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल जबरदस्तीने काढून नेले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन साळवी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com