युवा महोत्सवात स्वरप्रवाह ग्रूपची बाजी

युवा महोत्सवात स्वरप्रवाह ग्रूपची बाजी

पुणे, ता. १ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना व पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवात चंदननगरच्या स्वरप्रवाह ग्रुपने लोकगीताचे सादरीकरण करून प्रथम तर लोकनृत्यामध्ये उंड्रीच्या डान्स ॲडिक्ट्स ॲकॅडमीने लोकनृत्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

स्वरप्रवाह ग्रुपने वाघ्या मुरळी लोकगीताचे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकाविला तर सेंट मीराज् इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलच्या मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पोवाडा सादर करीत द्वितीय क्रमांक मिळविला. लोकनृत्यामध्ये डान्स ॲडिक्ट्स ॲकॅडमीने पंजाबचे लोकनृत्य भांगडा सादर करून प्रथम क्रमांक मिळवला. तर पूना कॉलेजने द्वितीय क्रमांक मिळवला. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन व ऑफलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पूना कॉलेजच्या पीमसे हॉलमध्ये राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोनल नागपुरे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागूल, सहायक अधिकारी शिल्पा चाबुकस्वार, राष्ट्रपती युवा पुरस्कार विजेते व पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ताहेर आसी, उपप्राचार्य लूबना खान, उपप्राचार्य इक्बाल शेख, क्रीडा संचालक डॉ. आयाज शेख, डॉ. बाबा शेख, डॉ. शाकीर शेख, क्रीडा शिक्षक इम्रान पठाण, अशद शेख आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com