शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून करणाऱ्यास जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून करणाऱ्यास जन्मठेप
शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून करणाऱ्यास जन्मठेप

शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून करणाऱ्यास जन्मठेप

sakal_logo
By

पुणे. ता. १ : शेजारी राहत असलेल्या महिलेचा खून करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि सात हजार रुपये दंड सुनावला. सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला. नवनाथ रामचंद्र पानसरे (वय २९, रा. भाड्रवली, भोर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने भोरमधील ३५ वर्षीय महिलेचा २७ फेब्रुवारी २०१५ रोजी खून गळ्यावर वार करून खून केला होता. याबाबत अनिल लक्ष्मण डोंबे (वय ४०, रा. भोर) यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पानसरे आणि संबंधित महिला हे शेजारी-शेजारी राहायला होते. घटनेच्या दिवशी त्याने महिलेचा टोकदार हत्याराने गळ्यावर वार करून खून केला. त्याला महिलेच्या घरातून बाहेर पडताना या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार दिलीप राठवडे आणि सुनीता राठवडे यांनी पाहिले होते. याबाबत खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पानसरे याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याकडे चौकशी केली होती. त्यात त्याने हा खून केल्याचे कबूल केले होते.
खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले. न्यायालयीन कामकाजात पोलिस हवालदार ए. एम. शेख यांनी मदत केली. हा गुन्ह्याचा खटला परिस्थिती जन्य पुराव्यांवर अवलंबून होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top