‘गुरुकृपा’ची वर्षअखेर दिव्यांग सैनिकांसोबत साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गुरुकृपा’ची वर्षअखेर दिव्यांग सैनिकांसोबत साजरी
‘गुरुकृपा’ची वर्षअखेर दिव्यांग सैनिकांसोबत साजरी

‘गुरुकृपा’ची वर्षअखेर दिव्यांग सैनिकांसोबत साजरी

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः गुरुकृपा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खडकी येथील क्विन मेरीज् टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट देऊन दिव्यांग सैनिकांसोबत वर्षअखेर साजरी केली.
या प्रसंगी सुजाता चौहान यांनी सैनिकांसाठी गीतगायन केले व त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. सैनिकांनीही उत्तम गाणी गायली. गुरुकृपा संस्थेचे पुणे कार्यवाह प्रशांत थोरात यांनी ज्यांनी आपल्यासाठी पूर्ण जीवन दिलं, त्यांच्यासोबत वर्षाअखेरीचा थोडा वेळ तरी घालवावा आणि त्या आठवणी घेऊन पुढच्या वर्षामध्ये प्रवेश करावा या विचाराने प्रेरित होऊन आम्ही येथे आलो असल्याचे सांगितले. तसेच, गुरुकृपा संस्था १९९४ पासून चालवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी जितेंद्र सिंह या दिव्यांग सैनिकाने ‘में दिव्यांग हूँ’ ही कर्नल वसंत बल्लेवार यांनी लिहिलेली कविता सादर केली. क्विन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूटचे डीन आणि डेप्युटी सीईओ कर्नल वसंत बल्लेवार यांनी गुरुकृपा संस्थेच्या या कार्यक्रमामुळे सैनिकांचे मनोबल आणि नीतिधैर्य उंचावण्यास ठोस मदत झाली, असे सांगितले. सीईओ कर्नल राहुल बाली यांनी यापुढेही आपण अशा प्रकारचे कार्यक्रम करत राहू, असा विश्वास व्यक्त केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top