‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षांव

‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षांव

पुणे, ता. १ ः वाचकांबरोबर विश्वासार्हतेचा ९० वर्षांचा प्रवास पूर्ण करून ९१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ‘सकाळ’वर वर्धापन दिनानिमित्त शनिवारी शुभेच्छांचा वर्षाव झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा स्नेहमेळावा होऊ शकला नाही. मात्र, ई-मेल, व्हॉटसअप, फेसबुकवर प्रतिक्रिया व्यक्त करून ‘सकाळ’बद्दलचा स्नेह वाचकांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊनही काही वाचकांनी शुभेच्छा दिल्या.
एक जानेवारी आणि ‘सकाळ’चा वर्धापन दिन यांचे अतूट नाते आहे. बातमीच्या माध्यमातून गेल्या ९० वर्षांपासून ‘सकाळ’ने पुणेकरांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे १ जानेवारीच्या वर्धापन दिनाला पुणेकरांची मोठी गर्दी ‘सकाळ’च्या आवारात होते. मात्र, कोरोनामुळे गर्दी टाळावी, असे आवाहन करून उपस्थितांच्या संख्येचेही बंधन प्रशासनाने घातल्यामुळे ‘सकाळ’ने वर्धापन दिनानिमित्त होणारा स्नेहमेळावा यंदा स्थगित केला. मात्र राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, शैक्षणिक, उद्योग, व्यापार आदी क्षेत्रातून फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावरून ‘सकाळ’चा व्हर्च्युअल स्नेहमेळावा रंगला. दिवसभर त्यावर लाईक, कमेंटचा पाऊस पडत होता. विद्युत रोषणाईने ‘सकाळ’ची इमारतही उजळली होती. स्नेहमेळावा स्थगित झालेला असतानाही शुभेच्छा देण्यासाठी अनेक वाचकांची पावले ‘सकाळ’कडे वळत होती.

‘के ॲण्ड क्यू’ परिवारातर्फे ‘सकाळ’च्या अंकाच्या प्रतिकृतीचा केक तयार करण्यात आला. परिवाराच्या सदस्यांनी ‘सकाळ’च्या कार्यालयास भेट देऊन हा केक कापून वर्धापनदिन साजरा केला. तसेच ‘प्रहार’चे प्रसिद्धी प्रमुख रफीक खान, पुणे जिल्हा पॅराशूटींग असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष गाडे, खजिनदार आकाश कुंभार यांनीही ‘सकाळ’मध्ये केक कापून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com