देशात ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा ‘यूजीसी’चा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशात ७५ कोटी सूर्यनमस्कार
घालण्याचा ‘यूजीसी’चा उपक्रम
देशात ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा ‘यूजीसी’चा उपक्रम

देशात ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा ‘यूजीसी’चा उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. १ : देशातील तीस राज्यांमधील ३० हजार शिक्षण संस्थांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांच्या साहाय्याने तब्बल ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत (यूजीसी) करण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम आयोजित केला आहे.
या उपक्रमात सहभागी होण्याची सूचना आयोगाने देशभरातील सर्व शिक्षण संस्थांना दिली आहे. १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे. विद्यार्थ्यांमध्ये योगासनांविषयी जागृती करण्यासाठी, योगासनांचे महत्त्व कळावे, यासाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे. केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालयाची मान्यताप्राप्त संस्था असलेल्या नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन या संस्थेमार्फत हा उपक्रम राबविला जाणार आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून आरोग्याविषयी जागृती वाढली आहे. व्यायाम आणि योगासनांद्वारे आरोग्याची काळजी घेण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. या पार्श्वभूमीवर वर्षाच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत सजग करण्यासाठी सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये यांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना आयोगाने दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top