शिष्यवृत्ती परीक्षेसाठी साडेसहा लाख विद्यार्थ्यांचे अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी साडेसहा लाख विद्यार्थ्यांचे अर्ज
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी साडेसहा लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी साडेसहा लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

sakal_logo
By

पुणे, ता. २ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आतापर्यंत जवळपास सहा लाख ८९ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहेत. त्यातील सुमारे सहा लाख ४६ हजार ३३८ विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ३१ डिसेंबरला बंद झाली असून अर्ज प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती.


राज्यातील शासनमान्य शाळांमधून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने फेब्रुवारी २०२२ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपली आहे. राज्यातील ४५ हजार तीन शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिंनींची संख्या तुलनेने जास्त आहे.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एक लाख ९६ हजार ५६३ विद्यार्थिनींनी, तर आठवीच्या परीक्षेसाठी एक लाख ५१ हजार ३१ विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे.
ही शिष्यवृत्ती परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे.
परीक्षेबाबत सविस्तर माहिती ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे.


शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्या विद्यार्थ्यांची संख्या
- तपशील : पाचवी : आठवी
- नोंदणी केले विद्यार्थी : ३,९७,८०१ : २,९१,९५५
- अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेले विद्यार्थी : ३,७४,६११ : २,७१,७२७
- अर्ज प्रलंबित असलेले विद्यार्थी : २३,१९० : २०,२२८

मुला-मुलींची संख्या
तपशील : इयत्ता पाचवी : इयत्ता आठवी
विद्यार्थी : १,७८,०४८ : १,२०,६९६
विद्यार्थिंनी : १,९६,५६३ : १,५१,०३१
एकूण : ३,७४,६११ : २,७१,७२७

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top