न्यू इंग्लिश स्कूलचा १४२ वा वर्धापन दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू इंग्लिश स्कूलचा १४२ वा वर्धापन दिन साजरा
न्यू इंग्लिश स्कूलचा १४२ वा वर्धापन दिन साजरा

न्यू इंग्लिश स्कूलचा १४२ वा वर्धापन दिन साजरा

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता प्रशालेचा १४२ वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पारितोषिक वितरण समारंभ व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी गौरव कोंडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. मुख्याध्यापिका दर्शना कोरके यांनी शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. पर्यवेक्षिका अनिता भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी दहावी आणि नववीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे विनायक रामदासी यांना उपक्रमशील शिक्षक म्हणून विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. योगेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर उपशालाप्रमुख सुधीर विसापुरे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top