रूबीची यशोगाथा आज साम टीव्हीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रूबीची यशोगाथा आज साम टीव्हीवर
रूबीची यशोगाथा आज साम टीव्हीवर

रूबीची यशोगाथा आज साम टीव्हीवर

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : रुग्णसेवेचा वारसा जपत आरोग्य क्षेत्रात आपला ठसा निर्माण करणाऱ्या रूबी हॉल क्लिनिकची यशोगाथा ‘महाब्रॅड्स’मधून मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रीय ब्रँडना सलाम करणारा हा कार्यक्रम साम टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे. त्या अंतर्गत मंगळवारी (ता. ४) दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी रूबी हॉल क्लिनिकचा प्रवास साम टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे. रूबी हॉल क्लिनिक आणि डॉक्टर केकी बैरामजी ऊर्फ के. बी. ग्रँट यांचा पुणे शहराची वैद्यकीय क्षेत्रातील आघाडीचे शहर म्हणून ओळख निर्माण करण्यात सिंहाचा वाटा आहे. डॉ. के. बी. ग्रँट यांनी १९५९ मध्ये ससून रस्त्यावर अवघ्या दोन खाटांचं हॉस्पिटल सुरू केलं होत. रूबी हॉल क्लिनिकची आज पुण्यात तीन मुख्य हॉस्पिटल्स आणि राज्यातील विविध छोट्या शहरांमध्ये २० केंद्रे आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top