पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची पार्किंगच्या नावाखाली लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची पार्किंगच्या नावाखाली लूट
पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची पार्किंगच्या नावाखाली लूट

पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची पार्किंगच्या नावाखाली लूट

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः पुणे स्टेशन फलाट क्रमांक एकमधून बाहेर आल्यावर ओला, उबेर गाडी बुक केली. पिकअप आणि ड्रॉप मार्गात गाडी येताच गाडीत बसलो. परंतु, गेटवर वीस रुपये द्या, अशी मागणी केली जाते. विचारपूस केल्यावर पार्किंगचे पैसे सांगितले जातात. मात्र, गाडी तर एक क्षणासाठी कुठेही पार्क केल्याचे आठवत नाही. पैसे दिल्याशिवाय गाडीच बाहेर सोडली जात नव्हती. शेवटी घरी जाण्याची घाई होती. काही कारण नसताना पैसे द्यावे लागले, असा अनुभव प्रवासी जयंत देवधर यांना आला. ही एक प्रकारची लूट असून, तत्काळ कारवाई करून वसुली बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसराला रिक्षावाले आणि टॅक्सी चालकांनी गराडा घातलेला असतो. त्यामुळे गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेऊन मागे गाड्या थांबल्या आहेत, लवकर पैसे द्या अशी घाई केली जाते. आपण जर नाही म्हटले, तर दादागिरीची भाषा केली जाते. हे पैसे प्रवाशानेच द्यावे, असे वाहनचालक सांगतो. कारण याचा हिशेब त्याच्या आकारलेल्या रकमेत नसतो. पैसे दिल्यानंतर मात्र पावतीही दिली जात नाही. ही एकप्रकारची फसवणूक असून, यावर प्रतिबंध घातला पाहिजे. पुणे विमानतळावर अशा प्रकारे पैसे घेतले जात नाहीत, असा माझा अनुभव आहे. रिक्षावालांच्या आडमुठेपणा व उद्धट पार्किंगवाल्यांमुळे पुणे स्टेशन आधीच बदनाम झाले आहे, त्यात अजून ही भर पडत आहे, असे देवधर यांनी सांगितले.

‘‘असा प्रकार घडत असल्याची कोणतीही तक्रार आली नाही. प्रवाशांनी रेल्वेकडे लेखी तक्रार करावी. संबंधित विभागाकडून कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. पिकअप आणि ड्रॉप सेवेसाठी कोणतेही पार्किंग शुल्क भरण्याची गरज नाही. पार्किंग केले असेल, तर शुल्क आकारण्यास परवानगी आहे.’’
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top