स्थानिक स्वराज्य संस्थांना शाळांबाबत निर्णयाचे स्वातंत्र्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानिक स्वराज्य संस्थांना
शाळांबाबत निर्णयाचे स्वातंत्र्य
स्थानिक स्वराज्य संस्थांना शाळांबाबत निर्णयाचे स्वातंत्र्य

स्थानिक स्वराज्य संस्थांना शाळांबाबत निर्णयाचे स्वातंत्र्य

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : ‘‘स्थानिक पातळीवर कोरोनाच्या संक्रमणाची परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक स्वराज्य संस्थांना आधीच देण्यात आले आहेत, असा पुनरुच्चार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे. राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, अचानकपणे शाळा सुरू राहणार की बंद होणार याबाबत उलटसुलट चर्चा सध्या होत आहे. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था घेतील, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील शाळा विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी सज्ज झाल्याचेही सांगितले.
राज्यातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, आरोग्य अधिकाऱ्यांची गायकवाड यांनी सोमवारी ऑनलाइनद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर राज्यातील शाळा इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तसेच शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवला आहे, अशी माहिती गायकवाड यांनी आढावा बैठकीनंतर ट्विटरद्वारे दिली आहे.
‘‘उस्मानाबाद, चंद्रपूर, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यांतील शाळेत जपानी मेंदूज्वर या आजारावरील लसीकरण सुरू आहे. या जिल्ह्यांत लसीकरणासाठी आणखी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाशी चर्चा करण्यात येईल’’, असेही गायकवाड यांनी सांगितले.
या बैठकीत राज्यातील शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे लसीकरणासाठी लाभार्थी विद्यार्थी, लसीकरणाचे नियोजन आणखी चांगल्या प्रकारे कसे करता येईल, विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, याबाबत बैठकीत चर्चा झाली. यात शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक, शिक्षण संचालक, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी सहभागी झाले होते.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या
पुणे : ५,६३,४००
नगर : २,८५,३३७
औरंगाबाद : २,६४,५११
जळगाव : २,४२,४१३
मुंबई (एकूण) : ६,२५,०५२
नागपूर : २,७३,६८७
नाशिक : ३,५७,८०७
ठाणे : ४,५३,६४२

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top