सावित्रीबाईंच्या पुतळा अनावरणासंबंधी संघटना आक्रमक

सावित्रीबाईंच्या पुतळा अनावरणासंबंधी संघटना आक्रमक

पुणे, ता. ३ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रमावरून विद्यार्थी संघटना आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षकांत झटापट झाली. सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी मुहूर्त चुकल्याने संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यपालांनी वेळ न दिल्यामुळे आजचा कार्यक्रम होऊ शकला नाही, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटना, स्टुडंट हेलपिंग हँड तसेच, युवा सेनेच्या विद्यार्थी या संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आक्रमक झालेल्या संघटनांकडून पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला गेला.

राज्यपालांना उशिरा निमंत्रण ः भुजबळ
सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविला असून, पुतळ्याचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचं राज्यपालांना उशिरा निमंत्रण दिलं, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यपालांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. आम्हीच त्यांना उशिरा कळवलं होतं, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यपालांनी दुसरे कार्यक्रम घेतले होते. भुजबळ म्हणाले, ‘‘तीन तारखेला जयंतीदिनी अनावरण करावं हा आमचा प्रयत्न होता. एका महिन्यात सर्व घडामोडी घडत गेल्या. काम पूर्ण होईल की नाही याची शाश्‍वती नव्हती. त्यामुळे राज्यपालांना निमंत्रण दिल आणि काम पूर्ण झालं नसतं तर? राज्यपालांना नाव ठेवण्यात अर्थ नाही, राज्यपालांना आम्ही उशिरा कळवलं, काम पूर्ण होईल की नाही याबाबत शंका होती.’’ आता नऊ तारखेला संध्याकाळी विद्यापीठातील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होईल. आणखी आठ दिवस मिळताहेत चांगलं काम करू. राज्यपालांनी दुसरे कार्यक्रम घेतले होते, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com