दीड लाखाचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीड लाखाचा ऐवज लंपास
दीड लाखाचा ऐवज लंपास

दीड लाखाचा ऐवज लंपास

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः उपचारांसाठी गेलेल्या महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी गीता बाळासाहेब घुले (वय ५९, रा. भापकर मळा, मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी यांची तब्येत बरी नसल्याने त्या २८ ऑक्‍टोबर रोजी रास्ता पेठ येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाच्या घरी गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात जायचे असल्याने त्या भावाकडे मुक्कामाला थांबल्या. त्या दुसऱ्या दिवशी घरी परतल्या, त्यावेळी त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी घरातील १० हजार रुपयांची रोख रक्कम, नवीन टिव्ही, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसात तक्रार दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top