पुण्यात उद्या परिवर्तन साहित्य संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात उद्या परिवर्तन साहित्य संमेलन
पुण्यात उद्या परिवर्तन साहित्य संमेलन

पुण्यात उद्या परिवर्तन साहित्य संमेलन

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ एक दिवसीय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन साहित्य संमेलना’चे आयोजन शुक्रवारी (ता. ७) सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्‍घाटन सकाळी ११.३० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या उद्‍घाटन सोहळ्याला राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार गिरीश बापट, आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहीर, प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी सांगलीचे आमदार मोहन कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, साहित्य, सांस्कृतिक, उद्योग, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात येणार आहे. यात साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, लेखक राजकुमार तांगडे, दिग्दर्शक नीलेश आंबेडकर, उद्योजक नजीर तांबोळी, डेक्स्टो मोटर्सचे संचालक शशिकांत कांबळे आणि रोहन कांबळे, संशोधक व उद्योजक गौरव सोमवंशी, उद्योजक स्तुती बोथरा, चित्रपट प्रॉडक्शन नावेद अत्तार यांचा समावेश आहे. उद्‍घाटन सोहळ्यानंतर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलन व तिसऱ्या सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, असे धिवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top