शिका हॉटेल-स्टाईल नॉनव्हेज थाळी

शिका हॉटेल-स्टाईल नॉनव्हेज थाळी

पुणे, ता. ५ : सध्या नॉनव्हेज खाण्यासाठी थाळी हॉटेल्स प्रसिद्ध आहेत. मात्र पारंपरिक चवीच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकारही आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑथेंटिक पारंपरिक चवीची नॉनव्हेज थाळी घरच्या घरी बनवायला शिकून मित्र व नातेवाइकांना रुचकर ट्रीट देण्याची संधी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २१, २२ व २३ जानेवारी रोजी आयोजिली आहे. यामध्ये कोल्हापुरी मटण थाळी, गावरान चिकन थाळी व मालवणी फिश थाळी बनवण्यास शिकवले जाईल. यामध्ये कोल्हापुरी तांबडा व पांढरा रस्सा, मटण मसाला, मटण खिमा, गावरान चिकन मसाला, चिकन सुख्खा, चिकन फ्राय, चिकन आळणी, अंडा करी, कोंबडी वडे, फिश करी, फिश फ्राय, प्रॉन्स कोळीवाडा, प्रॉन्स पुलाव, जीरा राइस, सोलकढी आदी थाळीमधील सर्व पदार्थ त्यांच्या सिक्रेट टिप्स व ट्रिक्ससह शिकवले जातील.
संपर्क : ७६६६२३९४८७
संकेतस्थळ : https://bit.ly/३DQc३HR

बंदिस्त मेंढी पालन कार्यशाळा
मेंढीच्या लोकरबरोबरच मेंढीच्या मटणालाही सध्या भरपूर मागणी आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक तत्त्वावर बंदिस्त मेंढीपालन करता येईल का, शेळ्यांप्रमाणे मेंढ्या बंदिस्त होऊ शकतात का, बोलाई मटण म्हणजे काय असतं, परदेशात मेंढीच्या मटणाला मागणी आहे की शेळीच्या, मेंढी पालनाचे संपूर्ण अर्थशास्त्र व वेगवेगळ्या सुधारित जाती, चारा नियोजन, आरोग्य व्यवस्थापन आणि अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करणारी ऑफलाईन कार्यशाळा २२ व २३ जानेवारी रोजी आयोजिली आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ३५०० रुपये.
संपर्क : ९८८१०९९७५७
संकेतस्थळ : https://bit.ly/३DQc३HR

(वरील कार्यशाळांचे ठिकाण : एसआयआयएलसी, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com