‘भाऊ’ आत्मचरित्राचे 
पवारांच्या हस्ते प्रकाशन

‘भाऊ’ आत्मचरित्राचे पवारांच्या हस्ते प्रकाशन

पुणे, ता. ५ ः यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय तुकाराम तुपे यांच्या ‘भाऊ’ या आत्मचरित्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, साधना बॅंकेचे संचालक प्रवीण तुपे, पुस्तकाचे लेखक नारायण ढमे, अमर तुपे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, दत्तात्रेय तुपे यांना सर्वजण प्रेमाने भाऊ म्हणतात. भाऊ हे शेती सहकाराचा दांडगा अनुभव असलेली संयमी व्यक्ती. त्यांनी शेतीतील उत्पादनवाढीसाठी नवनवीन प्रयोग अंगीकारले. यशवंत कारखान्याबरोबरच भू विकास बॅंकेसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.’’ भाऊ हे आत्मचरित्र युवकांना निश्चित मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

फोटो ः हार्ड
पुणे ः शरद पवार यांच्या हस्ते दत्तात्रेय सुपे यांच्या ‘भाऊ’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com