दापोडीत तृतीयपंथींना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे महापालिकेने २०१३ पासून बोगस डॉक्टरांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.
दापोडीत तृतीयपंथींना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप
sakal
Summary

पुणे महापालिकेने २०१३ पासून बोगस डॉक्टरांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.

पुणे - पुणे शहरात (Pune City) गेल्या नऊ वर्षांमध्ये ४५ बोगस डॉक्टरांच्या (Bogus Doctor) विरोधात पुणे महापालिकेने (Municipal) गुन्हे (Crime) दाखल केले आहेत. वैद्यकीय संस्थांकडे नोंदणी न केलेल्या आणि पदवी घेतलेल्या पॅथीशिवाय इतर वैद्यक शाखेच्या आधारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा यात समावेश आहे.

पुणे महापालिकेने २०१३ पासून बोगस डॉक्टरांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. यासाठी स्थापन समितीची बैठक तीन महिन्यांतून एकदा होते. नुकतीच समितीची बैठक झाली असून, त्यामध्ये कारवाईबाबत आढावा घेण्यात आली. त्यातून ही माहिती पुढे आली.

ॲलोपॅथी, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी अशा वेगवेगळ्या पॅथींचे राज्य पातळीवर स्वतंत्र परिषद आहेत. पदवीधरांनी वैद्यकीय सेवा करताना संबंधित पॅथीच्या परिषदेकडे नोंदणी करणे आणि ती नोंदणीचे नियमित नूतनीकरण करणे डॉक्टरांवर बंधनकारक आहे. वैद्यकीय शाखेचा पदवी घेतलेल्या आणि नोंदणी केलेल्या पॅथीच्या आधारावर रुग्णांवर डॉक्टरांनी उपचार करणे अनिवार्य आहे. मात्र, काही डॉक्टरांनी त्यांच्या पॅथीकडे नोंदणी केलेली नाही, तर काहींनी पदवी घेतलेल्या पॅथीच्या व्यतिरिक्त इतर पॅथीची औषधे देऊन रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळून आले आहे, त्या आधारावर गेल्या नऊ वर्षांमध्ये ४५ बोगस डॉक्टरांविरोधात शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. त्यात एका डॉक्टरांवर दोन गुन्हे दाखल केल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

दापोडीत तृतीयपंथींना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप
पुणे पोलिस दलातील वांजळे, चौधरी, भोंग व उभे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

अशी होते कारवाई

- महापालिकेच्या पातळीवर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टरांबाबत समिती

- महापालिकेचे आरोग्य प्रमुख आणि सहायक आरोग्य प्रमुख यांच्यासह शासकीय आणि अशासकीय सदस्यांचा समावेश

- नागरिकांकडून डॉक्टरांसंदर्भात येणाऱ्या तक्रारी या समितीपुढे मांडल्या जातात.

- तक्रार दाखल झालेल्या डॉक्टरांची शैक्षणीक कागदपत्रे, त्यांच्या पॅथीच्या परिषदेकडील नोंदणी आणि त्याचे नूतनीकरण याची माहिती घेतली जाते

- ही माहिती पडताळून महापालिकेच्या विधी विभागाकडून फेरतपासणी केली जाते

- त्यानंतर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या बाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करतात

वर्ष ............ दाखल झालेले गुन्हे

२०१३ ......... ३

२०१४ ......... ११

२०१५ ......... ७

२०१६ ......... २

२०१७ ......... ४

२०१८ ......... ५

२०१९ ......... २

२०२० ......... २

२०२१ ......... ९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com