जुनी सांगवीत भाविकांच्या रांगा

जुनी सांगवीत भाविकांच्या रांगा

जुनी सांगवी, ता. २३ ः येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसर फुलून गेला होता. प्रकट दिनानिमित्त येथील श्री संत गजानन महाराज मंदिर सर्व न्यास मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याचबरोबर मंदिर अंतर्गत भागात फुलांची आरास, रांगोळी सजावट करण्यात आल्याने मंदिर परिसराचे सौंदर्य खुलून दिसत होते. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अध्यक्ष शरद ढोरे व अनिता ढोरे यांच्या वतीने महापूजा करण्यात आली.
महापुजेनंतर विजयग्रंथाचे पारायण करण्यात आले यात दोनशेच्या वर भाविकांनी पारायण केले. पारायणकर्ते विद्याधर जोशी यांनी व्यासपीठ नेतृत्व केले. महापौर उषा ढोरे व सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील टोणपे, नगरसेविका शारदा सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, विजय जगताप, न्यासाचे अध्यक्ष शरद ढोरे, जवाहर ढोरे, हिरेन सोनवणे आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामुहिक आरती करण्यात आली. शासकीय नियमांचे अनुसरण करून उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले. या बाबत परिसरात सॅनिटायझर, भाविकांची गर्दी टाळण्यासाठी प्रसादासाठी लावलेल्या रांगा यांचे नियोजन करण्यात आले होते. भक्तगणांच्या दर्शन व महाप्रसादासाठी लागलेल्या रांगा व गण गण गणात बोते या जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उन्हातही भाविकांनी दर्शन व महाप्रसादासाठी मैदानावर रांगा लावल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com