कालीचरणला न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालीचरणला न्यायालयीन कोठडी
कालीचरणला न्यायालयीन कोठडी

कालीचरणला न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालीचरण ऊर्फ अभिजित सराग याला न्यायालयाने गुरुवारी (ता. ६) न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. शेख यांनी हा आदेश दिला. समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे १९ डिसेंबरला शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानावर आयोजित ‘शिवप्रताप दिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव’ कार्यक्रमात दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालीचरण याच्यासह पाच जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कालीचरण महाराजाला जयपूरवरून ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने त्याला बुधवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. कालीचरणला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी पोलिसांतर्फे सरकारी वकील योगेश कदम यांनी केली.
कालीचरण याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदिन यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. शुक्रवारी (ता. ६) यावर पुन्हा सरकार व बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद होणार असून त्यानंतर जामीनावर अंतिम निर्णय होणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top