गजारिया आक्षेपार्ह ट्विट

गजारिया आक्षेपार्ह ट्विट

राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या पत्नी तसेच उपमुख्यमंत्री महोदय यांच्याविषयी आक्षेपार्ह व विकृत ट्विट केल्याबद्दल जितेन गजारीया याच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करावी- रविकांत वरपे

आज भारतीय जनता पार्टीचे गुजरातचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मीडिया प्रभारी जितेन गजारीया याने महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा.उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सौ.रश्मीताई ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्यावर आक्षेपार्ह व विकृत पद्धतीने ट्विट करून त्यांची प्रतिमा मालिन केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या पत्नी तसेच उपमुख्यमंत्री महोदय यांच्याविषयी आक्षेपार्ह व विकृत ट्विट केल्याबद्दल जितेन गजारीया याच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी केली असून त्यांनी राष्ट्रवादी युवकच्या वतीने वाकड पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. गजारीया याने श्रीमती सौ.रश्मीताई ठाकरे यांच्यावर अत्यंत विकृत पद्धतीने लिखाण करून महिलांच्या विषयीची प्रतिमा मालिन केली आहे.

सामाजिक सलोखा बिघडवणे, लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलीन करणे, महिलांच्याविषयी अपशब्द व आक्षेपार्ह विकृत लिखाण करणे अश्या कृत्यांविरोधात भारतीय संविधान आणि भारतीय दंड संहिताच्या नियमांनुसार IPC 499, 500, 504, 354 व IT ACT66/C कलमे लावून गुन्हा वाकड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com