‘म्हाडा’च्या ४ हजार सदनिकांची ऑनलाइन सोडत पडली पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘म्हाडा’च्या ४ हजार सदनिकांची
ऑनलाइन सोडत पडली पार
‘म्हाडा’च्या ४ हजार सदनिकांची ऑनलाइन सोडत पडली पार

‘म्हाडा’च्या ४ हजार सदनिकांची ऑनलाइन सोडत पडली पार

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे. ‘सर्वांसाठी घर’ हा उपक्रम सरकार प्राधान्याने राबविणार असून, म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

येथील जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात शुक्रवारी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४ हजार २२२ नवीन सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झालेल्या या ऑनलाइन कार्यक्रमास गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील आभासी पद्धतीने उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

या प्रसंगी, पवार म्हणाले, ‘‘सामान्य माणसाला घर आणि बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठे निर्णय घेतले. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. कोरोनाकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळाली. राज्यातल्या सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शहरी आणि ग्रामीण भागांत विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घर’ कार्यक्रमांतर्गत सर्वांना हक्काचं घर देण्याचा प्रयत्न आहे. कोरोनामुक्तीसाठी लसीकरण हेच मोठे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

निराश न होता पुढील सोडतीत भाग घ्यावा
म्हाडाच्या ऑनलाइन सोडतीमध्ये ज्यांना हक्काची घरे मिळणार आहेत, त्यांचे पवार यांनी अभिनंदन केले. तसेच, इतरांनी निराश न होता, पुढील सोडतीत भाग घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top