अर्हम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्हम
अर्हम

अर्हम

sakal_logo
By

शिक्षण हे सामाजिक प्रगती आणि मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचे साधन आहे, हा विचार घेऊन ‘अर्हम फाऊंडेशन’ची स्थापना डॉ. शेलेश पगारिया, डॉ. आतिश चोरडिया यांनी केली. शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालय चालविले जाते. याशिवाय बिझनेस मॅनेजमेंट, व्होकेशनल प्रोग्राम, कला, वाणिज्य, विज्ञान आणि हॉटेल-टुरिझम मॅनेजमेंट ही महाविद्यालये देखील संस्था चालविते. या संस्थेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारही मिळाले आहेत. कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, काश्‍मीर आणि कारगिल फेस्टिव्हल यासारख्या सामाजिक उपक्रमांच्या आयोजनातही संस्थेचा नेहमी सहभाग असतो.
------
स्पर्धा परीक्षांची तयारी आता बारावीपासून!
महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला की अधिकारी बनण्यची इच्छा मूळ धरू लागते. अनेकदा अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात, हे देखील आपल्या गावी नसते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पदवी घेतली की शिक्षणबाह्य संस्था स्पर्धा परीक्षांचा प्रचार करू लागतात. मग आपल्याला या परीक्षांविषयी माहिती होते. त्यानंतर आपण या परीक्षांच्या तयारीला लागतो. एक वर्ष हे परीक्षेचा ढाचा समजून घेण्यात जातो. नंतर पुढे अभ्यासाची पद्धती समजते. तोपर्यंत दोन वर्षे निघून गेलेली असतात. आता मात्र अधिकारी होण्यासाठी फार वेळ दवडण्याची गरज नाही. आझम कँपसमधील अर्हम महाविद्यालयाने आता नवयोजना आखली आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्याने बारावीला प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून घेतला जाणार आहे.

महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतल्यानंतर आपण आधी पदवी मिळविण्याचा विचार करतो. मग स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष. आधी पदवीचा अभ्यास की स्पर्धा परीक्षांचा या पेचप्रसंगात विद्यार्थी हरवूनही जातात. पदवी हाती पडली की मग स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू होते. आता त्याला पर्याय उपलब्ध होणार आहे. अर्हम महाविद्यालयाने बारावी ते पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा विचार करून नियमित अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही त्या ती वर्षांना जोडला आहे. यामुळे बारावीपासून स्पर्धा परीक्षांविषयक माहिती विद्यार्थ्यांना कळू शकेल. पदवी मिळेपर्यंत हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सक्षम बनेल, अशी त्यांची योजना आहे.
स्पर्धा परीक्षांबाबत पालकही अनेकदा सतर्क असतात. मात्र त्यांनाही आपल्या पाल्याने पदवी शिक्षण पूर्ण करावे, असे वाटत असते. परंतु अर्हमने दिलेल्या या पर्यायामुळे आता पालकांना त्यांच्या पाल्याच्या चांगल्या करिअरसाठी शालेय जीवनापासून पायाभरणी करता येणार आहे. अधिकारी व्हायचे म्हटले की स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही. एमपीएससी, यूपीएससीच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस, डीवायएसपी, पीएसआय, एसटीआय, एएसओ या पदांपर्यंत पोचता येते. परंतु त्यात यश मिळविण्यासाठी योग्यवेळी अभ्यास देखील सुरू झाला पाहिजे. मग यश हे तुमचेच असते. म्हणूनच या स्पर्धेत आपल्या मुलांना यशस्वी करण्यासाठी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची क्षमता विकसित करणे गरजेचे असते. त्यासाठी अर्हम महाविद्यालयाच्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावी, याचा अनुभव आणि आत्मविश्वास अंगी बाणण्यासाठी अर्हम महाविद्यालयाची मदत होणार आहे.
----
स्पर्धा परीक्षांचे मॉडेल
- प्रत्येक विषय शिकविताना पाठ्य पुस्तके, संदर्भ पुस्तके, तसेच राज्य शिक्षण मंडळ आणि एनसीईआरटीची पुस्तके, ताज्या घडामोडी यांचे संदर्भ देऊन विषयाची तयारी करून घेतली जाणार.
- विषय पूर्ण झाल्यानंतर स्पर्धात्मक परीक्षा घेणाऱ्या आयोगाचे प्रश्‍न सोडवून घेतले जाणार. नंतर तज्ज्ञ शिक्षकांनी तयार केलेले टेस्ट पेपर घेतले जातील.
- विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या टेस्ट पेपरच्या आधारे त्यांचे मूल्यांकन केले जाईल. यातून विद्यार्थी कोणत्या विषयात कमी आहे, हे तपासून त्यांना मार्गदर्शन केले जाणार.
- प्रशासनात सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे विद्यार्थी-अधिकारी संवाद सत्रांचे आयोजन केले जाणार. त्यातून स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जायचे, याबद्दल मार्गदर्शन मिळणार.
------------
एका छताखाली शिका अनेक भाषा!
विद्या धनम सर्व धन प्रधानम हे ज्ञानाचे ब्रीद असेल, तरी कोणतेही ज्ञान मिळवायचे असेल, तर त्यासाठी भाषा अवगत असणे आवश्‍यक असते. तुम्हाला ज्ञान कोणत्या भाषेत घ्यायचे आहे, यावर भाषा ठरविता येते. आपण आपल्या शालेय जीवनात मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा शिकलो. त्यांची आपल्याला तोंड ओळख झाली. पण त्यावर प्रभत्व आपण मिळविले का, असा प्रश्‍न विचारला तर? आपण या भाषा तोडक्या मोडक्या बोलू शकतो. परंतु त्यावर प्रभुत्व मिळालेले नसते. मात्र आता बदलत्या युगात तुम्हाला भाषेवर प्रभुत्व असणे ही गरजेची बाब झाली आहे. आता मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा समजून उपयोग नाही. या भाषांवरही आपल्याला प्रभुत्व असणे महत्त्वाचे असतेच. मात्र या भाषांव्यतिरिक्त संस्कृती, प्राकृत, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश भाषा आपल्याला अवगत असणे गरजेचे बनले आहेत.

- अनेक परदेशी कंपन्या आता भारतीय बाजारपेठांमध्ये येत आहे. त्यां कंपन्यांमध्ये वापरली जाणारी इंग्रजी भाषा आपल्याला शिकायलाच लागते. याशिवाय कंपनी कोणत्या देशातून आली, त्याची भाषा देखील आपल्याला अवगत असली पाहिजेच. म्हणून अर्हम फाऊंडेशनने आठ भाषांचे प्रशिक्षण देणारे अर्हम इंडियन ॲंड फॉरेन लँग्वेज सेंटर सुरू केले आहे. तिथे भारतीय प्राचीन भाषांबरोबरच अनेक परदेशी भाषाही शिकता येणार आहे. एका छत्राखाली या भाषा शिकविल्या जाणारी असल्याने एकापेक्षा अधिक भाषांचे प्रशिक्षणही या केंद्रात आपल्याला घेता येणार आहे. त्यासाठी भाषा तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.

- कोणतीही परदेशी भाषा आपल्याला शिकायची असेल, तर त्यासाठी वयाचे बंधन नसते. या केंद्रातही तरुणांबरोबर ज्येष्ठ नागरिकांना भाषा शिकण्यासाठी प्रवेश घेता येणार आहे. तरुणांना देखील आता परदेशात नोकरीच्या संबंधी उपलब्ध होत असल्याने वेगवेगळ्या देशांच्या भाषा शिकणे क्रमप्राप्त झाले आहे. यातून मोठ्या पदावर आणि चांगल्या पगारावर काम करण्यासाठी त्यांना मिळू शकते. त्यासाठी भाषा शिकून घेणे आले. म्हणूनच अर्हम फाऊंडेशनचे हे बहुभाषा प्रशिक्षण केंद्र आता सर्वांच्या उपयोगी ठरणार आहे.

- रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी भाषा शिकणे हा एक भाग. परंतु आता विविध भाषांमध्ये संशोधनही होऊ लागले आहे. उदाहरणार्थ संस्कृती, प्राकृत, मराठी या भाषांवरही संशोधन होऊ लागले. त्यासाठी भाषांची गरज लागते. भारतातील तसेच परदेशी साहित्य देखील आता विविध भाषांमध्ये अनुवादित होऊ लागले आहे. म्हणूनच वेगवेगळ्या भाषांमध्ये साहित्य अनुवादासाठी भाषेवर प्रभुत्व मिळविणे ही गरज बनली आहे. यातून अनुवादाचा व्यवसाय देखील सुरू करता येऊ शकतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top