सकाळ सोशल फाउंडेशन - बातमी

सकाळ सोशल फाउंडेशन - बातमी
Published on: 

बूस्टर डोस मोहिमेस
ज्येष्ठांचा प्रतिसाद
पुणे, ता. २५ ः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन, पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने व ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून पुणे शहर परिसरातील साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी २० फेब्रुवारीपर्यंत सोमवार ते शनिवार सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मोफत बूस्टर डोस लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेस ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे (कोव्हिशील्ड) दोन डोस पूर्ण होऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना या मोहिमेअंतर्गत बूस्टर डोस देण्यात येत आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहिलेल्या अठरा ते साठ वर्षांच्या सर्व नागरिकांना देखील लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

हे लक्षात ठेवा
१. १८ ते ६० वयोगटातील नागरिकांनी पहिल्या व दुसऱ्या डोससाठी पुढील लिंक ओपन करून रजिस्ट्रेशन करावे. तसेच लसीकरणासाठी येताना आधार कार्ड, ओटीपीसाठी मोबाईल घेऊन येणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी लिंक :- https://forms.gle/ZXoVLwnXi99NQdhS7
२. ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस साठी पुढील लिंक ओपन करून, रजिस्ट्रेशन करावे. तसेच लसीकरणासाठी येताना आधार कार्ड, ओटीपीसाठी मोबाईल व दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन यावे.
३. नावनोंदणीसाठी लिंक :- www.sakalsocialfoundation.com/booster-dose.php
अधिक माहितीसाठी संपर्क (१० ते ५) - ८६०५०१७३६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Court Employees Suspend Strike Temporarily After Bombay High Court Intervention
msc bank vidyadhar anaskar
FDA Action Against Six Food Businesses at Manikbagh Food Street in Pune
union minister for jal shakti cr patil