याद करो कुर्बानी संकल्पनेवर यंदाची
चित्रपट संग्रहालयाची दिनदर्शिका

याद करो कुर्बानी संकल्पनेवर यंदाची चित्रपट संग्रहालयाची दिनदर्शिका

पुणे, ता. ७ : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘याद करो कुर्बानी’ संकल्पनेवर आधारित दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. संग्रहालयाच्या ‘https://www.nfai.gov.in/’ या अधिकृत संकेतस्थळावर ही दिनदर्शिका उपलब्ध करून दिली आहे. दिनदर्शिकेत संग्रहालयाने जतन करून ठेवलेल्या विविध भाषांमधील चित्रपटांमधील स्वातंत्र्ययोद्ध्यांची अतिशय दुर्मीळ छायाचित्रे पाहता येणार आहेत.

यामध्ये ‘झाँसी की रानी’(हिंदी - १९५३) चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेतील मेहताब, ‘शहिदे -ए-आझम-भगतसिंग’(हिंदी - १९५४) चित्रपटातील चंद्रशेखर आझाद यांच्या भूमिकेतील पी. जयराज, ‘वीरपांडीय् कट्टाबोम्मन’(तमीळ - १९५९) चित्रपटातील वीरपांडीय् कट्टाबोम्मनची भूमिका करणारे शिवाजी गणेशन, ‘उमाजी नाईक’(मराठी - १९६०) या चित्रपटात उमाजी नाईक यांची भूमिका करणारे गजानन जहागीरदार, ‘शहीद’ (हिंदी - १९६५) या चित्रपटात भगतसिंग यांची भूमिका साकारणारे मनोजकुमार, ‘सुभाषचंद्र’ (बंगाली - १९६६) चित्रपटात सुभाषचंद्र बोस यांची भूमिका करणारे अमर दत्ता, यांसह अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या छायाचित्रांचा यामध्ये समावेश असेल. यावर्षी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची ‘ई-दिनदर्शिका’ अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com