रणपिसे, आनंदास यांनाही पदक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रणपिसे, आनंदास यांनाही पदक जाहीर
विनामास्कविरुद्ध कारवाई तीव्र

रणपिसे, आनंदास यांनाही पदक जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत दादाराम रणपिसे यांना ‘विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल’, तर फायरमन चंद्रकांत नारायण आनंदास यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

प्रशांत रणपिसे हे अग्निशामक दलात ३४ वर्षांपासून कार्यरत आहेत. २०१५ पासून ते मुख्य अग्निशामक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, जनता वसाहत, गंगाधाम येथील अग्निशामक केंद्रे तयार झाली. २०१४ मध्ये राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळविणारा अग्निशामक विभाग म्हणूनही विभागाचा गौरव झाला. कोरोनाकाळात त्यांनी शहरातील सर्व कोविड सेंटरचे फायर ऑडिट करून आगीच्या दुर्घटना टाळल्या आहेत. त्यांना २०१० मध्ये ‘गुणोत्कृष्ट अग्निशामक सेवा’ राष्ट्रपती पदक प्राप्त झाले होते. त्यानंतर आता उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले.

आनंदास यांना ‘गुणोत्कृष्ट अग्निशामक सेवा’ राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे. त्यांनी विविध आगी व अपघाती घटनांमध्ये धाडसी कामगिरी केली आहे. त्यांनी २००५ मधील टिंबर मार्केट येथील आग, मांढरदेवी येथील आग व चेंगराचेंगरीत अडकलेल्यांची सुटका केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top